मनोमिलन
मनोमिलन
शुभ्रधवल कांतीवरती
चमकती तारे।
आसमान जणू धरतीवरती
आज फिदा झाले!
पूर्वेला क्षितिजावरती
रवि उधळत आला!
हिरवागार शालू नेसून
पृथ्वी उभी स्वागताला!
रंग तुझा सोनियाचा
आज लाल झाला।
सूर्य जणू तिमिराला
भेटण्या अधिर झाला!

