मनी काहूर दाटतांना
मनी काहूर दाटतांना
सांग ना सख्या
किती हा दुरावा
सांजवेळ झाली
ओढ लागली जीवा
सखी मला विचारी
हरितालिका येणार
सोळा श्रृंगार करून
तू एकटीच दिसणार
हळदीच्या रूपाने
गौराई पुजणार
तुझा चेहरा पाहण्यास
जीव कासावीस होणार
मी नात्या गोत्यात
तू सातासमुद्रापार
दिस सरतो आठवणीत
रात्री विचांराचे काहूर
आता सोसवत नाही
रात्रीचा हा विरह
तुला मिठीत घेण्यास
मनी काहूर दाटले
आसवांची गर्दी
डोळ्यात दिसते
घरकुलांच्या सुखात
त्याला विराम देते

