STORYMIRROR

Vaishali Belsare

Romance

4  

Vaishali Belsare

Romance

मन वेल्हाळ

मन वेल्हाळ

1 min
575

तुझ्या गालावरची खळी

जणू मोहक गं चांदणी

तुझ्या काजळल्या डोळ्यांची

झुके अलवार पापणी 


झुके अलवार पापणी

तुझी चाहूल लागता

होई अचानक स्तब्ध

मन वेल्हाळ धावता


मन वेल्हाळ धावता

गुंफे सतरंगी धागे

रमे स्वतःत सर्वदा

नाद कोणता हा लागे


नाद कोणता हा लागे

गाव वेगळे हे सजे

दोन मनाच्या अंतरी

स्वरधुन वेडी वाजे


स्वरधुन वेडी वाजे

पैलतीरी सरीतेच्या

झाली उतावीळ राधा

शोधे व्याकुळ कृष्णाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance