STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

मन तुझ्यात गुंतले

मन तुझ्यात गुंतले

1 min
301

झाली माझी नजरानजर

अन् भरल थेट मनात

सावरली मी बट माझी

हरवले मी एका क्षणात


वेड लावीले जीवास माझ्या

त्याला सतत असे बघता

होता जरी तो नजरेआड

कासावीस मी त्याला पाहण्या


एक क्षण बघा असा आला

भेट घडली ही अवचित

निरुत्तर उभीच राहिली

मज न उमजे कदाचित


मूक संवाद असा साधिला

कटाक्षांनी नजर क्षणिक

माझे मला कळले नाही

कसे, कधी, झाली अवचित


होता देवाण घेवाण अशी

चार शब्दांची ही अमुच्यात

भेटण्याचे ठिकाण ठरले

मन झाले फार अगतिक


अशी ती भेट ही घडलेली

स्मरे ती अजुनही ही मनी

मन माझे गुंतले तुझ्यात

मज कळले ते त्याच क्षणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance