मन बावरे
मन बावरे
१.
नजरभेट होता तुझी साजना
मनी उमलती आठवांचे झरे...
अत्यानंदे पुलकित तन अन
सुखाच्या सरींनी हे मन बावरे...
२.
प्रीत तुझी माझी अतूट बंधन
मन घेतसे तुजपाशी धाव रे...
सुखवी तुझा सहवास होतसे
सुखाच्या सरींनी हे मन बावरे..
३.
जमलीत सारी मुलेबाळे घरी
किलबिल करती जणू पाखरे...
एकाकीपण सरूनी जाहले
सुखाच्या सरींनी हे मन बावरे...
४.
बहरल्या छान वृक्ष, लता, वेली,
वर भिरभिरती फुलपाखरे...
चाहूल तुझ्या आगमनाची होई
सुखाच्या सरींनी हे मन बावरे...

