STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Classics

3  

अरविंद कुलकर्णी

Classics

मला पतंग व्हायचंय

मला पतंग व्हायचंय

1 min
223

आकाशात उंच उंच जायचंय

मी पणाचे ओझे टाकून

हलकंफुलकं व्हायचंय

मला पतंग व्हायचंय ....


पाहिलंय मी दुसऱ्या पतंगांना

आकाशात गोते खाताना

कोणीतरी काटतेय दोर आणि

पतंग हवेत भरकटताना ....


मला ही गोते खात

हवेत भरकटायचंय

तू माझा मांजा हो

मला ही पतंग व्हायचंय ....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics