मला आवडतं
मला आवडतं
पोहता येत असून सुद्धा
तुझ्या प्रेमात बुडायला आवडतं,
रस्ता माहित असताना देखील
तुझ्या डोळ्यात हरवून जायला आवडतं,
झोप नसताना देखील
तुझ्या केसांची चादर बनवुन विसावायला आवडतं,
तोंडाला चव नसताना देखील
पापड आणि लोणचं खायला आवडतं,
हातात हात धरून चालायला आवडतं,
तुला उगीचच भडकवायला आवडतं,
आणि नंतर ' शोना ' म्हणून मनवायला आवडतं,
आता मला माझंच कळत नाही मला काय आवडतं?
पण तुझ्या मिठीत श्वास घेणं नक्की आवडतं…

