आई
आई
1 min
5.7K
आई काय असते, हे खूप लोकांना माहित नाही.
ईश्वराचा रूप म्हणजे आई, मायेचं आभाळ म्हणजे आई.
प्रेमाचा पाऊस म्हणजे आई,
जी आपल्यासाठी करते सर्व काही, ती म्हणजे आई.
विसरतो आपण जिला झाल्यावर लग्न,
जोडीदारातच असतो आपण मग्न,
तरी सर्व विसरून, जी माफ करते स्वतःहून,
ती म्हणजे आई.
आपल्या भविष्यासाठी तिचे परिश्रम,
आणि तिच्या म्हातारपणी तिला वृद्धाश्रम,
अशी ही आजची पोरं, ज्यांच्या भविष्याची पानं कोरं.
दयेची अशी मूर्तिमंत रूप म्हणजे आई,
जी माझ्यासाठी सर्व काही.
