STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

मकरसंक्रमण

मकरसंक्रमण

1 min
162

तनात मस्ती

मनात आशा उमंग

गुळाच्या पाकात

तीळ मिसळून वाढवावा स्नेहसंग ।।१।।


एक कण स्नेहाचा

एक गोडव्याचा मिसळून बांधावा साकव अभंग

जिभेवर साखर पेरत

जिंकावे एकेकाचे अंतरंग ।।२।।


मधुर गीत गुणगुणत

उंच नभांतरी उडवू या पतंग

रंगबिरंगी पतंगाच्या सरमिसळीत

जाणावे व्यक्ती विशेषांचे भावतरंग ।।३।।


यशोशिखरी विहरता

कुणी न तोडावा आपला असिम आनंद

नात्यांच्या भावविश्वातील

विश्वासाचा मांजा राहो बुलंद ।।४।।


यशसमाधानाच्या वेलीचे

नभांतरी उठावे तरंग

प्रेमाच्या संतर्पणे वृद्धिंगत होवो

नात्यांच्या दृढतेचा पाया अखंड।।५।।


आपलेपणाचा गोडवा

आपुलकीच्या स्नेहाने 

उजळू देत अंतरंग

अविरत लाभो आपणास नात्यांची उबदार माया अभंग।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics