STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

मकर संक्रांत

मकर संक्रांत

1 min
220

उत्तरायण

सूर्याचे भ्रमण

संक्रातीचा सण 

मोदाचा क्षण


संक्रांत आज

मनात निश्चय

शब्दांचा संचय

मधुर साज


तो तिळगूळ

सार्‍यांना वाटू या

मने ती जपूया

हे माधूर्य मूळ


ते हेवे दावे

सोडूनची देऊ

आनंदची घेऊ

हो मनोभावे


स्नेह तिळाचा 

गुळाचा गोडवा

आनंदाचा ठेवा

असे मनाचा


सासरी आली

ती नव तरूणी

दिसेच देखणी

दागिने ल्याली


ती आभूषणे

केली हलव्याची 

लाली गोडव्याची

रूप देखणे


सौंदर्यवती

चंद्रकला काळी

हलव्याची जाळी

केसांवरती


लोभसवाणी

दागिने शोभले

सौंदर्य वाढले

रूपाचीखाणी


असा हा सण

आनंदाचा ठेवा

मनात जपावा

तोच तो क्षण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational