STORYMIRROR

Eknath Pandve

Inspirational

2  

Eknath Pandve

Inspirational

मिटू दे अंधार

मिटू दे अंधार

1 min
13.5K


तू अनुरक्त निशिदिनी कर्माचा

निजध्यास कातळात अंकुरण्याचा

नसावी तमा तेजोभंग अधिक्षेपाची

तेजाेमय भास्कर तू या विश्वाचा

दे झिडकारुन तटबंद्या अज्ञानाच्या

मिटु दे अंधार, भोवताल अन्यायाचा 

अन्वेषण सत्याचे निजसार हाच तूझा

असूदे अनुनय,अनुबंध हा मुक्तीचा

दुःख शोषीतांचे प्राशून तू विखारी

पुसून टाक निरंकार कलंक जिव्हारी 

पेटू दे संगर निखालस विचारांचे

प्राचीवर उमटू दे पावले विवेकाचे

दौडू दे मनामनात अश्वमेध शांतिचे

झिरपूदे कणाकणात निर्झर समतेचे

झेपावू दे आकाशी पारवे मुक्तीचे

ठेव दृढ विश्वास जग परिवर्तनाचे

मोडून जीर्ण प्रघात हो तू सृजन

मार्ग निर्वाणीचा शोध तू सदैव 

कर वज्रप्रहार विकिर्ण विषमतेवर

विसरू नको अंधार, शोध तू उजेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational