Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shabana Mulla

Romance

3  

Shabana Mulla

Romance

मिठीत तुझ्या जाताना

मिठीत तुझ्या जाताना

1 min
845


मिठीत तुझ्या येताना


मोहरते मन माझे, मिठीत तुझ्या

येताना

सुख माझे हिंदोळे घेते, स्पर्श तुझा

होताना||धृ||

हरवून जाते मी कुठेतरी

आसमंती

धुंद होते मन, घेत तुझं सोबत

भ्रमंती

बिलगते तुला मी, कवेत तुझ्या

जाताना||१||

सुख माझे हिंदोळे घेते, स्पर्श तुझा

होताना||धृ||


दुःख सारे विसरून जाते, घेता हात

हाती

बरसतात सुर ते, मन माझे गीत

गाती

चिंब भिजून जाते, चुंबन तू

घेताना||२||

सुख माझे हिंदोळे घेते, स्पर्श तुझा

होताना||धृ||


धडधडते हृदय, तो क्षण समीप

येता

आहोश मध्ये डुंबून जाते, तू जवळ

घेता

लाजून गोरीमोरी होते, शृंगार

करताना||३||

सुख माझे हिंदोळे घेते, स्पर्श तुझा

होताना||धृ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance