मीच माझा शिल्पकार
मीच माझा शिल्पकार
आई वडीलांची कृपा
आहे संस्काराची धार |
संगे माझा अनुभव
मला याचाच आधार ||१||
माझ्या अनुभवा मुळे
उंच गाठीन शिखर |
नाही मागे पाहणार
लागे कितीही ठोकर ||२||
राही जो दुस-यावरी
जगताना विसंबून |
जायी त्याचा संसारात
कार्यभार हो बुडून ||३||
ध्येय गाठतांना जरी
कैक येतील संघर्ष |
तरी होईन यशस्वी
मनी ठेऊनिया हर्ष ||४||
जिद्द व मेहनतीने
ध्येय करीन साकार |
नको कुणाचा आधार
मीच माझा शिल्पकार ||५||