STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance Others

3  

Kalpana Nimbokar

Romance Others

मी तूझा

मी तूझा

1 min
181

मी तुझा

मी नेहमी, तूझाच,

हे जेव्हा तु मला सांगतो

शांततेचा एक कोपरा 

मनात तयार होतो


तुलाही कळतात माझे

हक्क तुझ्यावरचे

आणि तु देतोस कबुली

ते पुर्ण करण्याचे


तुझा शब्द न् शब्द

मी मनात रूजवित जाते

तुझ्या प्रेमा च्या रूपाने

त्याचे हक्काचे झाड होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance