STORYMIRROR

sant dnyaneshwar

Classics

1.0  

sant dnyaneshwar

Classics

मी माझें मोहित राहिलें

मी माझें मोहित राहिलें

1 min
16.1K



मी माझें मोहित राहिलें निवांत ।

एकरूप तत्‍व देखिलें गे माये ॥१॥


द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं ।

विश्वरुपें मिठी देत हरी ॥२॥


छाया-माया-काया हरिरूपीं ठायी ।

चिंतिता विलया एक तेजीं ॥३॥


ज्ञानदेवा पहा ओहंसोहंभावा ।

हरिरुपीं दुहा सर्वकाळ ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics