ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी ॥ समाधान तूंचि होसी ॥
परी समाधि हे तुजपासी ॥ घेईन देवा ॥१॥
नलगे मज भुक्ती ॥ नलगे मज मुक्ती ॥
तुझ्या चरणीं अती ॥ थोरा आर्ती ॥२॥
विठोजी म्हणे ज्ञानदेवा ॥ ज्ञानसागरा अनुभवा ॥
चनेंचि विसावा ॥ झाला मज ॥३॥
ऐके ज्ञान चक्रवर्ती ॥ तूं तंव ज्ञानाचीच मूर्ती ॥
परी पुससीजे आर्ती ॥ ते कळली मज ॥४॥
एक एक अनुभव कृपा ॥ पदांतरें केला सोपा ॥
तरी यांत माझी कृपा ॥ सकळही वोळली ॥५॥
ज्ञानदेवा चरणीं मिठी ॥ नेंसी पडली एके गोठी ॥
दृश्यादृश्य झाली एक भेटी ॥ प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥
कर ठेउनी कुरदृष्टी ॥ प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥
कर ठेउनी कुर ॥ सर्वांग न्याहार न्याहाळी ॥
म्हणे तुवां घेतली जे आळी ॥ ते सिद्धी तें पावेल ॥७॥
नामा उभा ॥ असे सन्मुख ॥ थोर खेद दुःख ॥
म्हणे ज्ञानांजन महासुख ॥ समाधी घेतसे ॥८॥