STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

2  

yuvaraj jagtap

Tragedy

मी एक नारी

मी एक नारी

1 min
310

मी एक नारी

जन्मापासूनच स्त्रीत्वामुळे

विखारी चटके 

नव्हे

सर्वांगी डागण्या

सोसत आलेली

माझ्यामुळेच आईच्या

मातृत्वावरही

कुटुंब निराशेचे आघात


त्यातूनही कशीबशी

आईच्या 

नरक यातनेतून

घेऊन जन्मास आले

धरेवर

तर इथे मरणासन्न

कपाळी आठ्या अन्

तिरस्कारी चेहरे


आता कुठे चार पाच

वर्ष पूर्ण होते न होते

तोवर

मादीरूपी या माझ्या देही

वासनांध नजरा 

जाळी विणायला

करतात सुरू

त्यात आप्त, बाहेरचे नातलग

कोणीही आपल्या

वासनापुर्तीसाठी

करीत राहतो अत्याचार

या कोवळ्या नाजूक

अन् न उमललेल्या

कळीवर


जसजशी होते मोठी

तसतशा कलंकाच्या

मोहरा गडद होत जातात

माणसातील पशु जागे होऊन

या देहाचे वासनांधतेने

लचके तोडत राहतात


अशा कलंकित देहास

कोण आता स्वीकारणार

मग आपसूकच 

पाय देहविक्रीकडे

वळतात

पोटाची खळगी 

भरण्याकरिता

तोच एक शेवटचा

मार्ग दिसतो

नाही तर

आत्महत्येने

शेवटचा अंक संपतो


माझ्या या अंतास

कारण झालेल्यांनाही

आई होती

त्यानेही मादीच्याच 

पोटी जन्म घेतलेला

तरीही 

मादीरुपी देहास

कलंकित करून

अंतास कारण

ठरलेल्या

मदमस्त नरास

याची का नाही 

उरलेली जाण


मी पुन्हा

जन्म घेईन

मादी म्हणूनच

दोन हात करील

या ढोंगी समाजाशी

शरीराने असेन मादी

पण नरासमान राहीन

बुरखा पांघरलेला

पापी दुष्ट नराधमांना

आई, बहीण यांच्याशी

कसे वागावे

याचा चांगलाच

धडा देईन

अन्

पुढील जन्मीही

नारी म्हणूनच जन्म घेईन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy