STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

मी एक कविता

मी एक कविता

1 min
252

जन्म माझा कविच्या कल्पनेतून झाला.

मला वेळ काळ काही नसतो.

कविच्या मनातले शब्द

ओठावरून लेखणीद्वारे कागदावर 

कधी उठेल काही नेम नसतो.

मी वेगवेगळे भाव प्रगट करत असते.

कधी निसर्गाचे गुणगान करते तर

कधी विद्रोक, संंवेदनशील रचनेत रमते

कवी एक असतो पण, त्याच्या 

कल्पना शक्तिचे भांडार अफाट असते.

तर कधी मी मायेच्या अथांग सागरा सारखी,

सगळ्या नात्यांची ममता भरभरून प्रगट करते.

गरीबांची गरीबी,शेतकऱ्यांची व्यथा,

मी अतःकरणाला भिडून व्यक्त करते.

समाज,लोकशाही,जाती,धर्म ,संप, 

मोर्चे ह्यावर मी भडाभडा बोलते.

भाव -भक्ती -श्रध्दा ह्यावर मी

एवढी नम्र,लीन व विनयशील होते की,

स्वर्गातले देव ही धरतीवर येऊन,

भक्तांना भेटतील अशी शाश्वती वाटते.

कवी आपल्या मौल्यवान अलंकारिक 

शब्दांनी मला सजवत असतो.

लोक त्याला वेडा ही म्हणत असतात

पण तो माझ्या रचनेत एवढा दंग असतो की,

त्याला माझ्याशिवाय करमत नसते.

अशी मी माझ्या कवीची लाडली कविता आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational