*मी अनुभवलेला पाऊस*
*मी अनुभवलेला पाऊस*
रोहिणी नक्षत्राची सुरुवात
झाली, आकाशात ढग आले ढग आले.
मतलई वारे वाहू लागले,
पाऊसाची चाहूल झाली.
बळीराजाची चाले घाई,आकाशाकडे
बघत जाई, बघत जाई.
सगळीकडे विजा चमकल्या,
पाऊसाची सुरुवात झाली.
बळीराजाने केली मशागत,
भुमातेच्या गर्भात बी पेरलं.
पावसाने हजेरी लावली,
भूमातेच्या गर्भातून अंकुर आले
बळीराजा पावसात सुखावून,
ओलेचिंब झाला ओलेचिंब झाला.
डोंगर दऱ्या वाहू लागले,
सौन्दर्याने फुलू लागले.
आला आला श्रावण महिना,
श्रावण सरी बरसू लागल्या.
रोहिणी नक्षत्राची सुरुवात
झाली, आकाशात ढग आले ढग आले.
*टीप लेखकाने सर्व हक्क राखून ठेवले आहे*