STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Romance

3  

प्रियंका ढोमणे

Romance

म्हणुनचं तुझं हास्य माझ्या मना

म्हणुनचं तुझं हास्य माझ्या मना

1 min
282

तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून

मलाही हसावं वाटतं...

सुंदर तुझ्या हास्यावर

माझं हृदय भुलून जातं...


दुःखातही हास्य तुझं

मला लाजवून टाकतं...

तुझ्या हास्यावरती

मन माझं वेडावून जातं...


गालावरची खळी तुझी

मनाला मदहोश करून जातं...

म्हणूनच हृदय माझं

तुझ्यावरती मरून जातं...


तुझं गोंडस हास्य

नभात चांदणं उमटवून जातं

म्हणूनच तुझं हास्य माझ्या मनाला भावून जातं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance