STORYMIRROR

Gauri Chavan

Inspirational

4  

Gauri Chavan

Inspirational

महाराष्ट्र मायभूमी

महाराष्ट्र मायभूमी

1 min
314

उषःकाळी भूपाळीचा 

आवाज घुमतो कानी

अज्ञानाच्या तिमीरातून जागेकरण्या 

दारी येते वासुदेवाची स्वारी


तुळजाईचे चरण स्पर्शूनी 

राष्ट्र करते वाराचा प्रारंभ 

चिंतेचा सागर दूर लोटूनी 

होई नवचैतन्य आरंभ 


शांत, संयमी, निर्मळ, लोभस 

अशी ही गोदा कृष्णाई 

घ्यावी अशी उत्तुंग भरारी 

शिकवी शिखर कळसुबाई 


शांतीचा वारसा जोपासती 

अजिंठा वेरूळ लेणी 

शिवबा शिकवी मावळ्यांना 

तलवारीची खेळी 


संग्रामाचा इतिहास अलौकीक

समजण्या दुर्ग घालती साद 

दुर्गाहुन मजबूत जवान मराठी 

त्याचा करू नये हो नाद 


राष्ट्रात माझ्या बळीराजाच्या 

कणा कणात भरला अंगार 

लावणीच्या घुंगरा घुंगरातून 

बोलत राही शृंगार 


नक्षलवाद दहशतवाद 

जात्याच्या दोन तळी 

अकस्मात मग निर्दोषांच्या 

दुःख वेदना भाळी 


कर्मभूमी परि शिकवी आम्हां 

झिजूनी कैसे व्हावे चंदन 

महाराष्ट्र मायभूमी चरणी 

माझे त्रिवार वंदन..... त्रिवार वंदन....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational