STORYMIRROR

Gauri Chavan

Tragedy

3  

Gauri Chavan

Tragedy

पोरी जरा जपून

पोरी जरा जपून

1 min
355

काळी सावळी असो वा गोरी

सुरकुतलेली वा असो कोवळी 

वखवखलेल्या नजरा शोधती 

फक्त कातडी कावरीबावरी 


नाही उरली जनांची ना मनाची

ना उरला कायद्याच्या धाक 

क्षणात अस्तित्वाच्या चिंध्या चिंध्या

आप्तांकडुनच विश्वासाची राख 


न्याय याचिका पडे उलथून 

असुरक्षित येथे उंबरठा 

कसायांच्या दावणीतल्या गायीचा 

आता कसा फुटावा हंबरडा? 


रात्रीसम दिवसही आता वैऱ्याचा

 चाल वाट पोरी जरा जपून 

अघटित घडता जीवनी ऐसै

 सोसाया अवसान आणावे कुठून? 


तूच हो काली ,तूच चंडी 

बनून ये तूच सौदामिनी 

स्पर्शती ज्या वासनांध नजरा 

ती नजरच टाक जाळूनी ...

ती नजरच टाक जाळूनी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy