STORYMIRROR

Gauri Chavan

Others

4  

Gauri Chavan

Others

रुम सोडली तेव्हा...

रुम सोडली तेव्हा...

1 min
406

विचार ठरला, सोडली रुम 

आवराआवरी ची एकच धामधूम 

दार बंद, लावलं कुलूप 

अन् डोक्यात पेटली वेगळीच टुम 


काय असेल बरं आता आत?  डोळे शांत मिटले क्षणभर 

सार रिकामच दिसलं  दिसली फक्त धुळ मणभर 


होती फक्त रिकामी खुर्ची 

रिकाम टेबल अन् रिकामी खाट 

उघडली कवाडं मनाची 

तर शब्दच शब्द होते आत 


हातात हात घालून 

चक्क फिरत होते एकत्र 

शब्दच शब्दांचे झाले होते 

आता पक्के मित्र 


हे शब्दच आमचे अजून 

करतात सुखदुःखाच्या गुजगोष्टी 

घालून अंजन नेत्री 

करतात सराव पाहण्या नवसृष्टी 


विनोदावर हसून एखाद्या 

वाढत होती तिथली गर्मी 

एखादा घाव शब्दांचा 

लागत होता शब्दांच्याच वर्मी 


घरच्या आठवणीने होवून कासावीस 

लपत होते गोधडीत 

सुट्टी लागली की मग मात्र 

सुसाट सुटले उधळीत 


कुणास ठाऊक, स्पर्शाविना आमच्या 

भिंतीलाही वाटते काय मुके? 

आमच्या विना आता काय 

रुमलाही वाटेल रिते रिते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन