STORYMIRROR

Gauri Chavan

Inspirational

3  

Gauri Chavan

Inspirational

अनभिज्ञ मी

अनभिज्ञ मी

1 min
291

राजस सखी तू लाभली मजला 

तूच अंतरीचे गीत गं, 

तूच आशा, तूच दिशा

तूच मार्गदर्शक मनमीत गं...


विस्कटल्या,गोंधळलेल्या मनाची

सुज्ञ प्रभावी भाषा तू,

शांती वंच्छित आयुष्याची

चैतन्यमय अभिलाषा तू...


आकांताने रडणाऱ्या बाळासाठी 

सरल अंगाई गीत तू,

भावना अन शब्दांना बांधणारी 

बहरलेली प्रीत तू....


अवखळ ,चंचल तरी निरागस

अथांग,निर्मळ ज्ञानसिंधू तू,

खवळलेल्या भावनांचे करता मंथन

अखंड आस्थेचा बिंदू तू...


तू भेटण्या आधी सखे गं, 

अनभिज्ञ मी स्वतः स्वतःशी

देऊन लेखणी हाती माझ्या 

भेटवलेस मज नव्या रुपाशी


तूच सखी मज प्रिय अती गं

विसर तुझा न कधी पडावा, 

तुझ्याच शब्दांच्या ओल्या मातीत 

संस्कारी देह आता घडावा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational