STORYMIRROR

Gauri Chavan

Inspirational

3  

Gauri Chavan

Inspirational

माझी ढाल

माझी ढाल

1 min
275

आज इवल्या हातांची गं 

मोतीमाळ माझ्या गळी 

तरी तुझ्या काळजीचा 

तीट माझ्या शोभे भाळी 


ऋणानुबंध जूने फार 

जोडी ईश्वर ज्याक्षणी नाळ 

दिला श्वासातला श्वास 

अभेद्य तू माझी ढाल 


मायेच्या तूझ्या पंखाखाली 

आनंदाचा उंची हिंदोळा 

दुःखी कष्टी मनास गं 

आश्वस्त तू गारवा 


गिरवली संस्कारांनी 

आयुष्याची पाटी कोरी 

संकटांची खोल दरी 

तारण्या तू खंबीर दोरी 


जिद्द तुझी मेहनतीची

फोडी दगडाला पाझर 

चूक भूल सामावन्या 

अथांग तू सागर 


देहबोली दूर लोटी 

नाती विखूरण्याची भिती 

रुप जनू देवघरातील 

तेवनारी तू शांत ज्योती 


उमगती वेदना साऱ्या 

आईपणाची आज जाण 

अल्लड माझ्या पदरी 

मातृत्वाचे जेव्हा दान 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational