Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Charpe

Inspirational

3  

Pallavi Charpe

Inspirational

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप

1 min
208


कुंभालगडाला जाग आली, जन्मा एक वीरपुत्र आला,

वारस होता हा उदयपूर, मेवाडच्या सिसोदिया वंशाला. 

उदयसिंह आणि, जयवंता बाईच्या पोटी असा हिरा आला,

शूरवीर महापराक्रमी राजा हा महावीर इतिहासात ठरला...


मुघलांना धूळ चारली परंतु, अधीन ना कधी त्यांना झाला,

हरवले कित्येकदा मुघलांना तरी उपेक्षित हा राहिला.

राज्यपद त्यागुनी त्याने हल्दी घाटीतून सर्व संघर्ष केला,

जीवाचे हाल केले परंतू कधी ना दुष्मनांना शरण गेला..


राणा सांगा, राणा कुंभा या राजांचा होता हा वीर वंशज,

जगज्येत्याचे स्वप्न बघणाऱ्या अकबराला याची दहशत.

पिता उदयसिंह राजाचे नव्हते कर्तृत्व तेवढे भारी,

तरी वाघाला हरवले बालपणी अशी होती शुरता न्यारी..


शक्तीसिंह नावाचा मदतीला होता भाऊ एक सावत्र,

चेतक घोड्याच्या त्यागाची गोष्ट झाली विख्यात सर्वत्र.

भिल्लांसवे कोंड्याचा मांडा करत हा राजा होता जगला,

सनातन धर्म वाचवायला होता बिचारा तो लढला..


अकबरला हरवल्याविना न बसणार सिंहासनावर,

या वचनाला शुरवीर हा जन्मभर होता जागला.

गवतावर झोपला आयुष्यभर अन् तिथेच प्राण त्यागला,

तरी लोकांना या राजाचा त्याग का कुणा नाही कळला?


अकबरनेही ज्याच्या मरणावर लिहिली हो शौर्यगाथा,

अशा या पराक्रमाची थोडक्यात सांगितली मी वीरगाथा.

अशा या शूरवीर राजाची आज आहे हो जयंती

सर्वांनी नतमस्तक व्हावे, यांना एवढीच माझी विनंती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational