STORYMIRROR

Pallavi Charpe

Inspirational

3  

Pallavi Charpe

Inspirational

तिची ओळख

तिची ओळख

1 min
361

पुरुषप्रधान संस्कृतीचा महान पुरुष म्हणवून घेतोस ना तू?

मग का नाही समजून घेत तिला,जिच्या पोटात वाढलास तू?

ज्या शब्दात शिव्या घालतोस नेहमी तिथूनच जन्मला आलास ,

स्त्री कडे बघताना जिथे जाते नजर तुझी तिथलच दूध प्याला तू?

सांग ना काय स्त्री म्हणजे अशी काय असते तुझ्यासाठी?

काय विचार करून अश्या घाणेरड्या नजरेने तिला बघतोस तू?

तुझी शेज सजवणारी, तुझे मुले जन्माला घालणारी?

एव्हढीच जर समजली असेल तिची पात्रता जर तू?

तर धिक्कार आहे तुझ्या आधुनिक विचारसरणीवर आणि

तिला तूच्छ समजणारा जगातला मोठा बिनडोक तू?

कसा विसरतो तू तिच्यामुळे मानव जन्म तुला लाभला

तिच्या त्याच अवयवांना ओरबडायला निघालास तू?

समजतोस ना जर स्वतःला खूप पुढारलेला महान मग

तिच्याशिवाय सांग ही सृष्टी निर्माण करू शकतोस का तू?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational