महामारी
महामारी


कोरोनाची महामारी, माणसं माणसाला दुरावली।
नाही धाम, नाही तीर्थ, नाही सोयराही दारी....।
काय ही महामारी आली।
नियतिचे दुष्टचक्र, असे का फिरले आहे?
विज्ञानाची गगनभरारी, हाती काय उरले आहे??
दुनिया सारी... हतबल झाली...
काय ही महामारी आली।
हाताला काम नाही, खिशात दाम नाही।
भीकही मिळेना कुठे, बंद सारी दारे झाली।
काय ही महामारी आली।
थांबला झगमगाट सारा, मधुशालाही बंद झाली।
मुक्त सारे पशु-पक्षी, माणसं स्थिरावली सारी...
काय ही महामारी आली।
राब राब राबणारी, धाव धाव धावणारी।
जीवघेणी स्पर्धा ही, आज थांबली.....।
काय ही महामारी आली।
थांबणे घरात आता, कर्तव्य बनले आहे।
रोखण्या अदृश्य शत्रू, प्रशासन सज्ज आहे।
दुनिया सारी लॉकडाऊन झाली।
काय ही महामारी आली।