।। मराठी महिने ।।
।। मराठी महिने ।।
चैत्र पालवी, वैशाख वणवा
जेष्ठ पौर्णिमेस वडाचा महिमा।
आषाढ वारी, विठू रायाच्या दारी
चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची मांदियाळी।
श्रावन सरी, सोनेरी ऊन
विहंगम सृष्टिला हिरवे पांघरुन।
भाद्रपदात येते, गौरी गणपतीची स्वारी
गुलालाची होते उधळन घरोघरी आरास न्यारी।
आश्विन शुद्ध बलिप्रतिपदा,
अभ्यंगस्नानाने लाभे आरोग्य संपदा।
फटाक्याची आतशबाजी, करुन लक्ष्मी पूजन
चकली, चिवडा मिष्ठान्नाचे भोजन....।
मार्गशिर्षातली चंपाषष्ठी
भरीत रोडगा, खंडेरायाच्या गोष्टी।
खारीक खोबरं, उधळून भं
डार
यळकोट यळकोट जय मल्हार।
पौष महिन्यात मकर संक्रात
सौभाग्याचे लुटून वान
स्नेह सौहार्दाची होते बरसात।
माघ शिवरात्रीस शिवशंभुची आराधना
यात्रा, उत्सव मांगल्याची होते कामना।
सर्वात शेवटी फाल्गुन येतो
डोंगर कपारी पळस फुलतो।
होळीच्या उत्सवाला उधान येते,
धुलीवंदनाची धमाल होते।
रंगाची करून उधळन,
सरत्या वर्षाला निरोप जातो।
नववर्षाची गुढी उभारण्या,
चैत्र पुन्हा सज्ज होतो।
मराठी महिन्यांची अशी ही परिक्रमा ।
संस्कृतिच्या विविधतेचा अनोखा महिमा।।