आई अन् बाबा
आई अन् बाबा

1 min

12K
तुटले संसार ज्यांचे
मने ही तुटून गेली।
मीपणाच्या अविर्भावात
मुलांची परवड झाली।
कुठे मिळाली आई
कुठे बाप सोडून गेला।
अपराध काय माझा?
प्रश्न मनास पडला।
नजरा या जनाच्या,
करती सवाल मजला।
कुणा कुणास जवाब देवू,
पोरकेपण छळते मजला।
गुदमरलो आज इथे
रस्ता शोधतो मी नवा।
आर्त माझी हाक आहे
आई अन् बाबाही हवा।।
आई अन् बाबाही हवा।।