STORYMIRROR

Pandit Warade

Classics

2  

Pandit Warade

Classics

मेघ पावसाळी

मेघ पावसाळी

1 min
148


ताप तापतो भास्कर

अंग भाजून निघते

धारा घामाच्या वाहती

सारे शरीर भिजते।।१।।


सुटे सोसाट्याचा वारा

झाडे वेली कोसळती

आकाशात तेव्हा कुठे

ढग जमाया लागती।।२।।


नभी काळे काळे मेघ

जलकुंभ मोठे मोठे 

त्यांच्या मध्ये भरलेले

दिसे पावसाचे साठे।।३।।


वाट पाहे बळीराजा

शेत तयार करून

डोळे नभाकडे त्याचे

केव्हा येईल वरुण।।४।।


मेघ पावसाळी जेव्हा

नभी डोळ्याला दिसतो

ऊरी आनंद दाटून 

बळीराजा सुखावतो।।५।।


मेघ पावसाळी येती

सुख साधने घेऊन

सृष्टी आनंदाने नाचे

शालू हिरवा नेसून।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics