मैत्रीचे बंध
मैत्रीचे बंध
मैत्री तुझी माझी
गंधित हे वारे
प्रसन्न क्षणात
बेबंद वावरे
मैत्रीत जग हे
सर्वांगी सुन्दरे
कसली वादळे
क्षणात सावरे
अक्षयी हे नाते
भाव ही गुंते रे
जग वेगळाले
मैत्रीत बावरे
कृष्णास ती राधा
मैत्री कळली रे
प्रेमाचा रंग तो
मनास आवरे
रंग बावरी ती
खुळी ही रित रे
मैत्रीत कसली
दुनियादारी रे
मैत्रीचा हा हात
जीवनी दिशा रे
आशेच्या दिव्यास
मैत्री ती ज्योत रे
मैत्री तुझी माझी
रेशमी बंध रे
जगी अनमोल
हीच ती ठेव रे