मैत्री तुझी माझी
मैत्री तुझी माझी
निरपेक्ष मैत्री जीवाला जीव देते
स्वार्थीपणाला न थारा देते
अपेक्षांचं ओझं कधीच नसत
उपकाराच्या भावना कधी न दाखवते
न पटलेल कायम तोंडावर सांगे
खचलेल्या मनाला उभारी देते
आयुष्यभराची सोबत म्हणून
जगण्याचे बळ देते
गुणदोष सारे समजावून घेते
इतरांसमोर होणाऱ्या हास्यापासून वाचविते
कमजोर मनाला धैर्य देते
एकांतात असताना साऱ्या जगाचे सार सांगते
वाटते कायम ऐकत रहावे त्याचे बोलणे
कधी न खंड पडे आपल्या भेटीमध्ये
कृष्ण - सुदाम्याची जोडी आपुली
अशीच साथ राहो जीवनामध्ये
गप्पा - गोष्टी रंगतात आनंदाने
मैफल सजते तुझ्या सोबतीने
अशीच राहू दे जोडी आपुली
निभवू सोबत विश्वासाने
