Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

PRAMILA SARANKAR

Romance Others

3  

PRAMILA SARANKAR

Romance Others

मैत्री... बंध मायेचे

मैत्री... बंध मायेचे

1 min
358


मैत्री म्हणजे मैत्री म्हणजे मैत्री असते... 


मैत्री मैत्री म्हणत 

कुणीही मैत्रीत पडत असतं,

तरीही या

पवित्र नात्याच्या बंधनात

दोन मनाचं समर्पण असतं..... 


मैत्री म्हणजे आपुलकीच्या नात्यांची गुंफणं, 

मैत्री म्हणजे दोन हळव्या जाणिवांच गुंतणं

मैत्री म्हणजे भूतकाळची आठवण

मैत्री म्हणजे भविष्याची साठवण.... 


मैत्री म्हणजे विचारांची देवाणघेवाण

मैत्री म्हणजे चुका सुधारण्याची संधी

मैत्री म्हणजे एकमेकींच्या विचारातून तयार झालेली सुंदर कलाकृती....


मैत्री म्हणजे असते आत्मियता

मैत्री म्हणजे असते शाश्वतता

मैत्री म्हणजे दोन असूनही एक असण्याची मधुरता....


मैत्री म्हणजे श्वास, 

मैत्री म्हणजे नवनिर्मितीचा ध्यास, 

मैत्री म्हणजे हास्य, 

मैत्री म्हणजे मनात फुलणारा प्राजक्त..... 


मैत्री म्हणजे वेडेपणा, 

मैत्री म्हणजे नाद खुळा, 

मैत्री म्हणजे हसता हसता, 

आनंद अश्रूंचा बहर खरा.... 


मैत्री म्हणजे 'हक्काचं ठिकाण'

मैत्री म्हणजे प्रेमाने साजरं केलेलं माहेरपण

मैत्री म्हणजे एकमेकींच्या हातात हात देऊन

शब्दांविना तयार झालेलं गोंडसपण... 


मैत्री म्हणजे बंध मायेचे

मैत्री म्हणजे बंध आपुलकीचे

मैत्री म्हणजे नसे तुझे माझे

मैत्री म्हणजे फक्त आणि फक्त आपले आपले....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance