STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

माय लेक

माय लेक

1 min
984



ऐका माय लेकीची ही

ऐसी अजब कहाणी

झाला बाप स्वर्गवासी

लेक ही आईची राणी।।


वारा वादळ झेलूनी

लाख संकटांची वाली

हाती शस्त्र घेवुनी या

रक्षा कराया निघाली ।।


लेक घडवण्या आई

गरीबीशी झूंज देई

रानावना लेकीसह

पाटे दुखांची ती खाई।।


चाले रडता पडता

अंगी जखमांची लाली

कर्तव्याला लाजवूनी

अहर्निष कष्ट झेली।।


आहे खरी भारतिय

नारी दृष्टांची ही वैरी

आली नशिबी कर्तव्ये

तरी घाबरली ना वरी।

मीनाक्षी किलावत

*प्रिया आज माझी*

चिंब माझे मन झाले आज

एकदम बहरून आली

सांजवेळी तरूखालीघ

प्रिया आज माझी झाली....

गोड हसणं गोड बोलणं

तसच प्रियेच लाजणं

स्वप्न मधूर रंगविण्यात मी

घातलेत काहीसे क्षण.....

तुजला पाहूनिया जसा का

फुलला या मनी मोगरा

अजून थोडी थांब सखे

विणुया आपण दोघे गजरा।।


तुजला बघूनी आंनदाने

आकाशी सूर्य प्रतिक्षा करी

कलात्मक आवेग पाहूनी तुझा

मन मोहुनी जाई अंतरी।।


सौंदर्याची खाण देखूनी

तूज दृष्ट कुणाची न लगे

प्रिया आज माझे मन अर्पूनी

घेईन तुजसवे विसावा जिवलगे।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance