STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा

1 min
213

दिसभर सर्वांसाठी

रवी कष्टला अपार

मावळत्या दिनकरा

घेई माझा नमस्कार ।।१।।


आगमन तुझे होता

जागे होई सृष्टी सारी

सजावट रांगोळीची

सडा सारवण दारी ।।२।।


पशू पक्षी झाडे वेली

सारे खुशीने फुलती

जन सारे  उत्साहाने

निज कामाला लागती ।।३।।


सातत्याने फिरतोस

कर्म योग तुझा सुरू

नित्य नेम  शिकवून

होशी साधकांचा गुरू ।।४।।


करो कुणी निंदा स्तुती

कुणी जरी शिव्या देती

भेदाभेद नाही  कधी

नाही दाखवत भीती ।।५।।


स्वतः देहाला जाळून

ऊब देतोस विश्वाला

मावळत्या दिनकरा

नमस्कार माझा तुला ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational