STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Inspirational

3  

Varsha Fatakale warade

Inspirational

माता रमाई

माता रमाई

1 min
506

माता रमाई साधी भोळी

बनून जीवनात त्यागमूर्ती 

संसारासाठी अहोरात्र झिजली

पतीची सावली झाली जगी कीर्ती


त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर होत

दलित रंजल्या-गांजल्यांचा मायेचा आधार

ज्या समाजाने केले होते अशा

गरीब अशिक्षितांना निराधार


पुण्यशील धैर्यशील महान रमाई

अमर राहील जगात तुमची पुण्याई

नष्ट केली अज्ञानाची खाई

आम्हास पूज्य ती माय रमाई


घेतला प्रण पती सवे

करण्या दलितांचा उद्धार

झरा मायेचा अवीरत ओसंडला

समर्पणाने दिला जीवनाला आकार


एक एक पैसा जोडून गवऱ्याही विकून

पतीचे धैर्य कधी खचू दिले नाही

दूरदेशी पती रमाई चालवी संसार

पतीस संसाराचे चटके कधी बसू दिले नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational