STORYMIRROR

Avanee Gokhale-Tekale

Romance

4.0  

Avanee Gokhale-Tekale

Romance

मारवा..

मारवा..

1 min
404

पाय मुडपून उभा गिरीधर, 

मथुरेत वाजवी पावा.. 

गोकुळात थबकली नार,

गंधाळून गेली हवा.. 

दूर राऊळ, नदीपार, कुणी झंकारे मारवा.. !!


सायंकाळी क्षितिजा पार,

निघाला पाखरांचा थवा.. 

थबकला माझ्या तरुवर,

नकळत एक चुकार रावा.. 

दूर राऊळ, नदीपार,कुणी झंकारे मारवा..!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance