STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

मार्ग

मार्ग

1 min
14.8K


मार्ग हा वळणाचा, तोल जाण्याचा

जरा जपून पाऊल टाका

मार्ग हा प्रेमाचा, आहे धुंदीचा

मार्ग हा काट्यांचा, आहे मिलनाचा

मार्ग आहे आनंदाचा, दु:खाचा

होईल कधी भास, हृदयी जाईल कधी तडा

मार्ग हा उताराचा, आहे जिव्हाळयाचा

मार्ग हा मोहाचा, जीव जाळ्यात अडकण्याचा

मार्ग हा वळणाचा,आहे जीवनाचा

मार्ग हा कष्टाचा, आहे घामाचा

मार्ग हा आवडीचा, आहे समाधानाचा

मार्ग हा कर्तव्याचा, आहे कर्माचा

मार्ग हा जीवनाचा , आहे कर्तुत्वाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational