STORYMIRROR

Nandini Menjoge

Inspirational

3  

Nandini Menjoge

Inspirational

मानवा घे मनी ध्यास !!

मानवा घे मनी ध्यास !!

1 min
214

असंख्य यातनांचा कल्लोळ 

अवहेलना तिची ही फार 

आजतरी थांबवावा हा ह्यास, 

मानवा घे मनी ध्यास !!


प्रगतीचा डोंगर जेथे हसतो 

तुडुंब उत्कर्ष झरा वाहतो  

येथे हिरवळीस का गळफास? 

मानवा घे मनी ध्यास !!


तंत्रज्ञान अन मानवाची मैत्री 

दुनियेस सुख चैनेची खात्री 

प्राणवायूचीही होतेय दमछाक 

मानवा घे मनी ध्यास !!


सिमेंट काँक्रीट ने सजतोय माळा 

त्यातील जाणिवांचा रंग काळा 

कर्तव्यास साहजिकच कुजल्या वृत्तीचा घास, 

आजतरी तुटावी निद्रा, फुटावा गर्वाचा आभास...!! 

!!मानवा घे मनी ध्यास !! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational