रोझ डे
रोझ डे
आई म्हणते
कश्याला उगाच
जुने घाव उकरून काढते?
जखमेवर खपली
धरल्याचा किती खोटा
ती आव आणते...
संसार दिसतो
गुलाबासारखा
फुललेला तिचा
किती टोचलेत काटे
ती कुठं सांगते...
अंथरून पायदळी
काट्याचे जरी
संसाराच्या गाड्याची
दोन्ही चाके ती हाकते..
लाल रंग प्रीतीचा
असला तरी
भोग नशिबाचे
तिच्या माथी मिरवते..
वादळे असंख्य
जरी प्रत्येक वादळास
ती हसत सामोरे जाते..
अशी असंख्य गुलाबे
अर्पण चरणी तिच्या
सुखाचे फुल मी तिच्या
आज वेणीत माळते..
