माणुसकीचा रंग
माणुसकीचा रंग
इंद्रधनुतील रंगासारखा
माणुसकीचा रंग...
पांढऱ्यातून निघून पुन्हा
पांढऱ्याचाच संग...
मोठ मन आहे
आभाळासारख...
सर्वांना सामावून घेत
पवित्र गंगेसारख...
चुकांची कबुली
पश्चातापाने होई...
दुसऱ्यांच्या चुकांना
पोटात सामावून घेई...
रंग वर्णांचा भेद
बाजूला सारून...
जातीभेदाला
निवारून...
माणुसकीच्या रंगाचा
फुलला पिसारा...
आपोआप प्रेमाचा
खळाळेल झरा...
