उंच माझा झोका...
उंच माझा झोका...
1 min
204
थबकले उंबऱ्यात मी
ऐकुनी नवी बातमी
होणार आहे मी
या घराची पाहूणी...
कसे सावरू मनाला
उठला हा गलबला
मन माझेच बाई
मानेना या घटनेला....
ज्या उंबऱ्यात वाढले
तो करी मला परका
का मी होऊ बाई
या घराची द्वारका...
जाऊ का कुणासवे मी
ना पाहिले कधीही
का होऊ राणी
न बघताच त्यालाही...
बघून त्याला मी तर
पार हरवून गेले
जणू स्वतःचे
अस्तित्व विसरले...
सुख दु:खाचा साथी
झाला माझा सखा
उंच आभाळी गेला
उंच माझा झोका...
