STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

माणसांच्या गर्दीत

माणसांच्या गर्दीत

1 min
166

आजतरी या जगात

खऱ्या माणसाला

कोणी विचारात घेत नाही

त्याच्या जगण्यालानी्

मरणालाही काहीच

महत्त्व देत नाही


त्याचे आपले सख्खेसोयरे

त्याच्या सोबत असतात

तरी तो एकटाच असतो

आपल्या माणसांसाठी

जगणारा माणूस मात्र

स्वतःसाठी जगतं नसतो


या जगात तर

खोट्या मणसांचा

उदोउदो करतील

देवघरात त्याचा फोटो

ठेवतील

त्याच्या सावलीपुढे 

नतमस्तक होतात

देवासारखं त्याला पुजतात


या माणसांच्या गर्दीत

खोटे मुखवटे घालून

फिरणारे खुप आहेत

पण त्यांना कोणी बरे

म्हणत नाही

खऱ्यानी् प्रामाणिक माणसाला एकदातरी

नमस्कार केल्याशिवाय

पुढे कोणी जात नाही


भल्या माणसाच्या

अंत्यसंस्काराला

फारसे कोणी येत नाही

राख विसर्जित झाल्यावर

घरात त्याची एकही आठवण राहू देत नाही


लबाडांच्या अंत्यदर्शनाला

स्मशानात गर्दी म्हावत नसते

त्याच्या स्मरणार्थ 

कुठल्यातरी रस्त्याला

त्याचे नाव दिले असते


आहो माणूस खरा खोटा

कसाही असुदेत एकदिवस त्याची राखचं

होणार आहे

एव्हढच आहे की

सुवर्णअलंकाराने

नटलेल्या माणसाची

मेल्यानंतर भरचौकात 

मूर्ती दिसते

खऱ्या माणसाच्या कर्तृत्वाची मात्र कायम किर्ती असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational