STORYMIRROR

Kalyani Borkar

Drama Fantasy Thriller

3  

Kalyani Borkar

Drama Fantasy Thriller

माणस वाचता का हो तुम्ही ?

माणस वाचता का हो तुम्ही ?

1 min
207

पुस्तके तर वाचली फार पण शब्द नाही कळले चार

मग शोधू लागले पुस्तक ज्यात असतील माणसाचे विचार

कधीकधी तर वाटते मला जर पुस्तकांतील ओळींसारखी

माणस वाचता आली असती तर काळजाला डखंणारी    

माणसं सहज दूर सारता आली असती

आतून कुजके विचार असणारी माणसं

प्रस्तावनेतच कळली असती,

मग मी मुळीच त्यांची पुढील पानं चाळली नसती

फार सोपं होऊन गेलं असत आयुष्य

पण... पुस्तकांतील ओळींसारखी सहज माणस वाचता येत नाही,

म्हणूनच खरी माणसं मनाला वेचता येत नाही,

कधी कधी तर पुस्तकांना पण खेद वाटत असावा कारण

पुस्तकांना लिहीणारी माणसंसुद्धा माणसासारखी वागत नाही,

आता आपणच सुरू करावी वाचणं माणसं,

निरखून, परखून सहज शोधावी माणसं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama