STORYMIRROR

Kalyani Borkar

Fantasy Inspirational Others

3  

Kalyani Borkar

Fantasy Inspirational Others

माणस वाचता का हो तुम्ही ?

माणस वाचता का हो तुम्ही ?

1 min
213

पुस्तके तर वाचली फार पण शब्द नाही कळले चार

मग शोधू लागले पुस्तक ज्यात असतील माणसाचे विचार


कधीकधी तर वाटते मला जर पुस्तकांतील ओळींसारखी माणसं वाचता आली असती

तर काळजाला डंखणारी माणस सहज दुर सारता आली असती,


आतुन कुजके विचार असणारी माणसं प्रस्रावनेतच कळली असती,

मग मी मुळीच त्यांची पुढील पानं चाळली नसती

फार सोपं होऊन गेल असत आयुष्य

पण... पुस्तकांतील ओळींसारखी सहज माणस वाचता येत नाही,

म्हणूनच खरी माणसं मनाला वेचता येत नाही,

कधी कधी तर पुस्तकांना पण खेद वाटत असावा कारण

पुस्तकांना लिहीणारी माणसंसुद्धा माणसासारखी वागत नाही,

आता आपणच सुरू करावी वाचणं माणसं,

निरखून, परखून सहज शोधावी माणसं......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy