का रे पावसा तू असा
का रे पावसा तू असा
का रे पावसा तू असा किती वाट बघावी
बघून बघून वाट, माझी लोचणे झाली रिकामी
तुझीच वाट रात्रंदिनी बाप माझा पाहतो
पाहून पाहून वाट तो स्वतःलाच कोसतो
कुठे हरवला पावसा माझा बाप आकांत करतो
पेरून बसला सगळं वावर बस चातकासारखी वाट बघतोय
तुझ्या आगमनाची चाहूल लागत केली जय्यत तयारी
कर्ज काढून आणलं बियाणं जसा सण होता माझ्या घरी
अरे रात्रीचा सुद्धा तो मला आता झोपताना दिसत नाही
सांगत बसतो यंदाही आम्हाला कर्ज फिटेल असे वाटत नाही
बापाला माझ्या थोडा धीर देण्यास मदत कर
काही खूप नको करू थोडा पाऊस पाठवून त्याला सुखी कर
त्याला आनंद तुझ्या असण्याने आहे फक्त तू थोडी कृपा कर
बरसव थोड्या पावसाच्या धारा होऊ दे दया आम्हावरी
चिंता त्याला पोरांच्या शिक्षणाची तू आता त्याच्या जीवाला घोर लावू नको
मी साकडं घालतो तुला त्याची ही इच्छा निकामी जाऊ देऊ नको
तुजवर अवलंबून आहे आयुष्य आमचे सारे
तू निराशेने आमच्याकडे पाहू नको