मानापमान
मानापमान
स्वप्नातील सत्याला धर्माची जाण नव्हती,
मातीत मिसळलेल्या सगळ्यांनाच जातीची आन होती.
स्वार्था पुढे जिथे सगळ्यांची मान झूकली होती,
माणसांच्या गर्दीत माणसे सुध्दा नकली होती.
माझी ओळख जी माझ्यासाठी थकली होती,
जिद्दी सोबत संघर्ष घेऊन पेटली होती.
बायको सारखी मानापमान सगळी नटली होती,
सगळ्यांच्या मनात किळसवाणी भावना सुटली होती.
हयात पणाची सगळीच लक्षणे आता सम्पली होती,
फक्त प्राण आहे म्हणून आयुष्या सोबत जुम्पली होती .

