माझ्यावर प्रेम करावं
माझ्यावर प्रेम करावं
एकांत क्षणी कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला
माझच नाव निघाव,
स्वप्नातही तिला मीच दिसावं
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव
मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव,
तिने हळूच माझ्याकडे बघाव
मी बघतांना तिने हळूच लाजाव,
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव
मी दिसताच तिने मग हळूच हसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव
अनमोल या जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

