तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला
तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला
1 min
48
तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला,
तुझ्या प्रत्येक शब्दांचा आवाज व्हायचंय मला,
तुझ्या हसण्याचं कारण बनायचं आहे मला,
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायचंय मला,
तुझ्या एकटेपणात सहभागी व्हायचंय मला,
तुझ्या अडचणीत साथ द्यायची आहे मला,
तुझ्या या निरागस मनात छोटीशी जागा
बनवायची आहे मला,
तुझ्या डोळ्यात बेधुंद होऊन, तुझ्या जगात
जगायचंय मला,
तुझ्या मिठीत पूर्ण आयुष्य अधिकाधिक सुंदर
करायचंय मला,
खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला...
